दहशतवादी हाफिज सईदच्या घराजवळ भीषण स्फोट, 2 जणांचा मृत्यू

Hafiz saeed
Last Modified बुधवार, 23 जून 2021 (14:25 IST)
इस्लामाबाद- लाहोरमध्ये दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा नेता हाफिज सईदच्या घराजवळ बुधवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन लोक ठार झाले तर महिला व मुलांसह 10-20 लोकं जखमी झाले आहे.
जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. स्फोट कसा झाला याचा तपास केला जात आहे.

जौहर टाउनमध्ये घडली स्फोटची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकात हा स्फोट झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा पथक दाखल झाले आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना ऑटोरिक्षा आणि खासगी कारमध्ये लाहोरच्या जिन्ना रुग्णालयात नेण्यात आले होते, असे मदत कामगारांचे म्हणणे आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच एका घरात हा स्फोट झाला आहे. या घरात संशायस्पद स्थितीत अनेक लोक ये जा करत होते. स्फोट झाला तेव्हा हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
स्फोट खूप जोरदार
या घटनेच्या साक्षीदारांचे म्हणणे आहे की स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की आजूबाजूची घरे आणि इमारतींचे काच तुकडे तुकडे झाले. या स्फोटात काही इमारतींचे नुकसान झाले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकला गेला.

मोटरसायकलमध्ये स्फोट
अद्याप स्फोटाचा प्रकार कळू शकला नाही. मात्र एका प्रत्यक्षदर्शीने जिओ टीव्हीला सांगितले की, एका व्यक्तीने मोटरसायकल घराबाहेर सोडली आणि नंतर त्यात स्फोट झाला. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून तपास सुरू केला आहे. परिसरात वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करत आहे. स्थानिक सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती मिळेपर्यंत कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. असंही सांगितलं जात आहे की, आधी गॅसची पाइपलाइन फुटली असावी आणि त्यानंतर
IED चा स्फोट झाला.


यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद, ...

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद, सुट्ट्यांची यादी बघा
Bank Holidays in November 2021 तुम्हीही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करणार असाल ...

वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला ...

वानखेडेंवर मलिकांचा लेटर बॉम्ब, स्पेशल 26 बाबत केला गोप्यस्फोट; जाणून घ्या पत्रात?
एनसीबीचे समीर वानखेडे यांच्याबाबत मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ...

अश्लील व्हिडिओ काढून दोन सख्ख्या बहिणींसोबत चार वर्ष केला ...

अश्लील व्हिडिओ काढून दोन सख्ख्या बहिणींसोबत चार वर्ष केला बलात्कार
जबलपूर- नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर एका तरुणाने बलात्कार केला आहे. या ...

तीन वाहनांचा अपघात; ४ भाविक ठार तर ५ जण जखमी

तीन वाहनांचा अपघात; ४ भाविक ठार तर ५ जण जखमी
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-खामगाव मार्गावर अकोला येथील तीन वाहनांच्या अपघातात चार ...

समीर वानखेडेविरोधातील आरोपांसोबत पुरावे सादर करा – क्रांती ...

समीर वानखेडेविरोधातील आरोपांसोबत पुरावे सादर करा – क्रांती रेडकर
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी धर्म बदलल्याचा ...