बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

245 लोकांनी एकत्र उडी मारली

दुनियेत नवीन काही करून दाखवण्याची जिद्द असलेले कमी नाहीत आणि त्यांचे हेच प्रयत्न त्यांना अद्वितीय बनवते. परंतू एक दोन नव्हे तर सोबत 245 लोकं मिळून काही वेगळं करण्याचा विचार करतात तर हे काही नावीन्य घेतलेलं असतं. ब्राझील येथील हॉर्टोलांडिया येथे एका पुलावरून 245 लोकांनी एकत्र उडी मारली. या लोकांनी लावलेल्या उडीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जागा मिळालेली आहे.
 
पहिल्यांदा एवढ्या लोकांनी लावलेल्या या उडीत महिलादेखील सामील होत्या. यांना एका दोरीने बांधून दिले होते. नंतर या सर्व लोकांनी सोबत पुलावरून उडी मारायला सांगितले. उडी मारल्यावर सर्व हवेत झुलू लागले. या उडीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जागा मिळाली.
 
या ग्रुपने 2016 मध्ये याच जागेवर तयार झालेला रेकॉर्ड मोडून काढला. मागील रेकॉर्डमध्ये या पुलावरून 149 लोकांनी सोबत उडी मारून रेकॉर्ड बनवला होता. रोप जंप एक साहसिक खेळ आहे ज्यात एका नायलॉनच्या दोरीने बांधलेले सर्व सहभागी सोबत उडी मारतात.