मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:24 IST)

या व्यक्तीला आहेत 27 बायका अन् 150 मुलं, अनेक लग्नांमुळे झाली होती शिक्षा

लहान कुटुंब - सुखी कुटुंब अशी एक म्हण तुम्ही ऐकली असेलच. आजच्या काळात 1 बायको आणि दोन मुले असा परिवार चालवणे ही मोठी गोष्ट आहे. पण कॅनडात राहणारे 65 वर्षीय विन्स्टन ब्लॅकमोर यांनी आयुष्यात 27 लग्ने केली. एवढेच नाही तर या विवाहांतून त्यांना 150 मुलेही झाली. ज्यांच्यासोबत ते आनंदाने एकत्र राहत आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला 27 बायकांच्या एकमेव पतीची ओळख करून देतो...
 
हे 65 वर्षीय विन्स्टन ब्लॅकमोर आहे, जे बहुपत्नी असल्यामुळे ओळखले जातात कारण त्यायनर 1-2 नव्हे तर चक्क 27 बायका आहेत आणि ते त्यांच्या सर्व बायका आणि 150 मुलांसह एकाच घरात राहतांत.
 
वडिलांबद्दल बोलताना, विन्स्टनची मोठी मुलगी मेरी जेन म्हणाली की जेव्हा तिचे वडील 18 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी तिच्या आईशी लग्न केले. 1982 मध्ये जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा तिच्या वडिलांनी क्रिस्टीना नावाच्या महिलेशीही लग्न केले.
 
मेरी 8 वर्षांची होती तोपर्यंत तिचे वडील विन्स्टन यांनी 5 लग्ने केली होती आणि हळूहळू त्यांचे कुटुंब वाढत गेले. मेरी सांगते की आत्तापर्यंत तिच्या वडिलांचे 27 वेळा लग्न झाले आहे आणि त्यांना 150 मुले आहेत.
 
एवढं मोठं कुटुंब चालवण्यासाठी घरातील प्रत्येकासाठी कामाची विभागणी केली जाते. मुली आणि महिला स्वयंपाक करतात, मुलांची काळजी घेतात आणि घरातील सर्व कामे करतात. तर पुरुष आणि मुले शेती करून घरखर्च भागवतात.
 
मेरी जेन सांगते की, लहानपणापासून आजतागायत तिच्या घरात भावा-बहिणींची एक संपूर्ण फौज आहे. जेवणाच्या टेबलावर एकत्र जेवायला बसल्यावर मोठी फौज भरवली जात असल्याचं जाणवतं. 
 
तथापि, विन्स्टनचे त्यांच्या बायका आणि घरातील मुलींबाबत अतिशय कडक नियम आणि कायदे आहेत. त्यांची मुलगी सांगते की घरातील महिलांना मेकअप करणे आणि केस कापण्यास बंदी आहे. इतकेच नाही तर कॅनडासारख्या देशात राहूनही त्यांना आंग झाकलं जावं असे कपडे घालावे लागतात.
 
विन्स्टनच्या घरात सिगारेट, चहा, कॉफी या सर्वांवर बंदी आहे. एवढेच नाही तर घरात टीव्ही, गाणी आणि या सर्व गोष्टी पाहण्यासही मनाई आहे. अशा परिस्थितीत मुले वाद्य वाजवून, नाचण्यात आपला वेळ घालवतात.
 
इतकेच नाही तर मेरीने असेही सांगितले की 2017 मध्ये तिच्या वडिलांना 6 महिने नजरकैदेत ठेवण्यात आले होते, कारण तिच्या वडिलांवर बहुपत्नीत्वाचा आरोप होता आणि 2018 मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. मात्र 6 महिन्यांनंतर ते स्वतंत्र झाले आणि आता आपल्या कुटुंबासह आनंदाने राहत आहे.