शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (16:30 IST)

गायीने गिळली सोन्याची साखळी, 35 दिवस बाहेर पडण्याची वाट बघत मालकाने उचलले हे पाऊल

कर्नाटकातील एक मोठे धक्कादायक प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथील एका गायीने वीस ग्रॅम सोन्याची साखळी गिळली आणि एक महिन्याहून अधिक काळ ती त्याच्या पोटात राहिली. पूजेच्या वेळी एका कुटुंबाने गायीला चेन आणि इतर दागिने घातल्याने हा सर्व प्रकार घडला. यादरम्यान गायीने सोनसाखळी गिळली. मग असे काही घडले की ज्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. संपूर्ण कुटुंब महिनाभर शेणखत तपासत राहिले आणि साखळी बाहेर आली नाही.
 
वास्तविक, ही घटना कर्नाटकातील सिरसी येथील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीकांत हेगडे असे या व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी गाय आणि तिच्या वासराला गौ पूजेत आंघोळ घालून त्यांना फुले व दागिने घातले. हे सर्व केले गेले कारण त्या ठिकाणी ही प्रथा आहे आणि तेथील लोक गायीला लक्ष्मी म्हणून पूजतात.
 
नेमक्या याच पूजेदरम्यान गायीने सोनसाखळी गिळली. हा प्रकार घरच्यांना कळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबाकडे पर्याय नव्हता, त्यामुळे जवळपास 35 दिवस सर्वांनी शेणखतावर लक्ष ठेवले. गाईच्या शेणातून साखळी बाहेर येत नाही ना ते तपासत राहिले. त्याने आपली गाय कुठेही बाहेर जाऊ दिली नाही, पण तसे झाले नाही आणि साखळीही बाहेर आली नाही.
 
यानंतर श्रीकांतने डॉक्टरांना बोलावून सल्ला घेतला. गाईला रुग्णालयात नेऊन गायीने खरोखरच साखळी गिळली आहे का, याची तपासणी केली असता, गायीच्या पोटात साखळी पडल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांच्या पथकाने गायीच्या पोटावर शस्त्रक्रिया करून साखळी बाहेर काढली. साखळी काढल्यानंतर तिचे वजन वीस ऐवजी 18 ग्रॅम एवढेच होते, परंतु साखळी परत आली.
 
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी ही साखळी काढून टाकावी लागेल अन्यथा गायीच्या आरोग्याला त्रास होईल, असा सल्लाही दिला होता. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असंही कुटुंबीयांनी सांगितलं, एका चुकीमुळे आपल्या गायीला एवढा त्रास झाला, याची त्यांना खंत आहे. सध्या गायीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.