सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (16:27 IST)

लग्नासाठी मुलगा बनला मुलगी, FB वर झालेल्या प्रेमासाठी घर सोडलं, पण..

दिल्लीतील मोहन गार्डन पोलिस स्टेशनच्या पोलिसांसमोर एक विचित्र तक्रार आली आहे. ही तक्रार फेसबुकवर प्रेमात सापडलेल्या फसवणुकीशी संबंधित आहे. फेसबुकवरून मित्राच्या प्रेमात एक मुलगा मुलगी झाल्याचा आरोप आहे. त्याने आपलं ऑपरेशन करवून घेतलं.
 
त्यानंतर अचानक ज्या व्यक्तीसाठी त्याने हे सर्व केले ती व्यक्ती फसवून पळून गेली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
24 वर्षीय पीडिता महाराष्ट्रात आपल्या कुटुंबासह राहते. पीडितेचं कुटुंब व्यवसायाशी जुळलेलं आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की फेसबुकच्या माध्यमातून त्याची दिल्ली येथील एकाशी मैत्री झाली, त्याने खूप प्रेमाच्या गोष्टी केल्या लग्नाचा वादा देखील दिला.
 
नंतर पीडित मुलाने प्रेमापोटी ऑपरेशन करवले आणि लिंग परिवर्तन करवून घेतलं. मुलगी झाल्यावर पीडिता आपलं कुटुंब सोडून प्रियकराकडे दिल्लीला पोहचली. दिल्लीत त्या तरुणाची भेट घेतली. तरुणाने भाड्याने घरत घेतलं होता जिथे या दोघांमध्ये संबंध बनले.
 
अनेकदा मुलाने पीडितासोबत दुष्कर्म केला आणि लग्नाचा आमिष दाखवलं. काही दिवस असेच सुरु होतं नंतर आरोपी मुलीला सोडून दिल्लीहून पळून गेला. आपलं कुटुंब सोडून आलेल्या पीडितेचे हाल झाले शेवटी तिने कुटुंबाशी संपर्क केला.
 
नंतर दिल्लीच्या मोहन गार्डन पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. दिल्ली पोलिस आरोपीला शोधत आहे.