आता चणा, चणा डाळचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये
जगभरात वाचल्या जाणाऱ्या ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये काही नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन शब्दांमध्ये भारतीय दैनंदिन आयुष्यातील भोजनात समाविष्ट असणा-या चणा आणि चणा डाळ या शब्दांनाही स्थान मिळाले आहे. यावेळी ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये 600 हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात चणा आणि चणा डाळ या शब्दांचाही समावेश आहे.
याव्यतिरिक्त ऑक्सफोर्ड डिक्शनरीत टेनिससंबंधीत असलेल्या काही शब्दांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रामुख्यानं 'फोर्स्ड एरर' आणि 'बेगल' या शब्दांचा समावेश आहे. शिवाय, 'वोक' आणि 'पोस्ट ट्रूथ' यांना डिक्शनरीत स्थान मिळाले आहे. 2016 मध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीत 'पोस्ट ट्रूथ' या शब्दाला 'वर्ड ऑफ द इअर' म्हणून घोषित करण्यात आले होते.