मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (12:30 IST)

अमेरिकेतील भंगार गोदामात सापडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, गेल्या महिन्यात चोरी गेली होती

न्यूयॉर्क : कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील उद्यानातून गेल्या महिन्यात चोरीला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या रद्दीच्या गोदामात सापडला आहे.
 
अमेरिकेच्या उत्तर भागात शिवाजीचा हा एकमेव पुतळा आहे. मर्क्युरी वृत्तपत्रानुसार 1999 मध्ये पुण्याने शहराला भेट दिलेला हा पुतळा 31 जानेवारी रोजी ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून चोरीला गेला होता.
 
या मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे. पोलिसांनी तो शोधून काढला आणि भंगार गोदामातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
 
वृत्तानुसार "हा पुतळा आपल्या भारतीय समुदायासाठी खूप मोलाचा आहे, जो आपल्या (मराठा शासक) शिवाजींबद्दलचा अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे," असे अहवालात सॅन जोसचे महापौर मॅट महान यांनी म्हटले आहे.
photo: symbolic