गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (15:37 IST)

Firing In US: कॅलिफोर्नियामध्ये एका समारंभात गोळीबार, 10 ठार

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. चिनी नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुमारे 16 जणांना गोळ्या लागल्या आहेत. 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरी पार्कमध्ये घडली. शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ताब्यात घेतले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 10 च्या सुमारास गोळीबार झाला. येथे मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी चंद्र नववर्षाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी समारंभात एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यादरम्यान अनेकांना गोळ्या लागल्या असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आदल्या दिवशी हजारो लोक उत्सवात सहभागी झाले होते. मॉन्टेरी पार्क हे लॉस एंजेलिस काउंटीमधील एक शहर आहे, लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनपासून अंदाजे 7 मैल (11 किमी) अंतरावर आहे.
Edited by - Priya Dixit