संबंधित माहिती
- वरुण सरदेसाई कोण आहेत? विधानसभेत त्यांच्यावर आज नवा आरोप का झाला आहे?
- औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती, बहिणीवर प्रेम करणाऱ्याची भरदिवसा हत्या
- मंगेश देसाईंनी केली “या” चित्रपटाची घोषणा
- धर्मवीर एका भागात संपणारा विषय नसून, तो एक खंड आहे,- मंगेश देसाई
- लिओनेल मेस्सी बार्सिलोनाला जाणार नाही, 2024 पर्यंत पीएसजीकडून खेळणार
शिर्डीत साईंच्या पालखीमध्ये गोळीबार
शिर्डीत साईंच्या पालखीमध्ये गोळीबार ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर येथे घडली. गोळीबारात एक जण जखमी गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव विकी भांगे असे आहे. जुन्या वैमनस्यातून पवारांवर गोळीबार करण्यात आला असा कयास लावण्यात येत आहे. गोळीबार करणारा आरोपी हा निलेश पवार याचा मेहुणा असल्याचं समजत आहे. दोन वर्षांआधी निलेशने आरोपीच्या बहिणीसोबत पळून लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरत आरोपीने निलेशवर गोळीबार केल्याचं बोललं जात आहे.
गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात निलेश जखमी झाल्याचे वृत्त आहे. खांद्याला गोळी लागल्याने त्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Edited by : Smita Joshi
Edited by : Smita Joshi
