सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (11:42 IST)

औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती, बहिणीवर प्रेम करणाऱ्याची भरदिवसा हत्या

murder
औरंगाबाद जिल्ह्यात बहिणीवर प्रेम करणाऱ्या एका तरुणाची  भरदिवसा पुणे महामार्गावर कुऱ्हाडयाने वार करून निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापू खिल्लारे(30)असे या मयत तरुणाचं नाव आहे. बापू खिल्लारे यांनी आरोपीच्या बहिणीशी घरातील लोकांचा विरोधात जाऊन 3 वर्षांपूर्वी एका तरुणीशी प्रेम विवाह केला. हा राग तरुणीचा भावाचा मनात होता. 
 
गुरुवारी 29 डिसेंबर रोजी बापू औरंगाबाद -पुणे महामार्गावरून दुचाकीने जात असताना त्यांना त्यांच्या मेहवण्याने महामार्गावरील दहेगाव बंगल्या जवळ इसरवाडी फाटा येथे अडवून त्यांच्यावर कुऱ्ह्याडने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बापू कोसळून खाली पडून तडफडत होते. रस्त्यावरील ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी हे भयानक दृश्य पहिले आणि त्यांचा थरकाप उडाला .

एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की वार झाल्यामुळे बापू तडफडून शांत झाला. त्याला मृत पाहून आरोपीने जल्लोष करत अंगातील शर्ट कडून हवेत फिरवत नृत्य करून पसार झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची नोंद घेतली आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. 
 
Edited By- Priya Dixit