गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (17:07 IST)

समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबार

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी पंत प्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आणि हा महामार्ग जनतेसाठी उघडण्यात आला. नागपूर येथील समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महामार्गावर एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्कार्पिओ मधून उतरतो आणि बार हवेत उंचावून गोळीबार करतो. तरुणाने हा व्हिडीओ रिल्स साठी केला आहे की हा तरुण विकृत मानसिकतेचा आहे हे अद्याप समजू  शकले  नाही . या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तरुण एका स्कॉर्पिओ मधून उतरतो पाठीमागे बोगदा दिसत आहे. हा तरुण हातात गन घेऊन हवेत गोळीबार करत आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी भागातला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून महामार्ग कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.महामार्गाच्या पहिल्या टोल नाक्यावर पहिला अपघात झाला.या भीषणअपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या महामार्गावर कधी बैलगाड्या  धावताना दिसत आहे तर कधी हरीण पळताना दिसत आहे तर कधी साप, माकड वाटेतून जाताना दिसत आहे. गोळीबार करणारा तरुण कोण आहे त्याने गोळीबार का केला या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास सुरु केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit