शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2024 (00:30 IST)

China-Taiwan : चीन ने लष्करी विमान तैवानच्या सीमेजवळ आढळले

तैवानच्या सीमेजवळ चीनचे सात लष्करी विमाने आणि पाच नौदलाची जहाजे शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस पहाटे दिसली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. सात चिनी लष्करी विमानांपैकी एका विमानाने तैवान सामुद्रधुनी ओलांडून तैवानच्या नैऋत्य हवाई संरक्षण ओळख झोन मध्ये प्रवेश केला. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून तैवान ने सशस्त्र दलाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आणि या भागात नियंत्रण म्हणून लढाऊ विमाने, नौदल जहाजे आणि क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली.  

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास तैवानच्या सीमेवर सात पीएलए विमाने आणि पाच पीएलएएन जहाजे आढळली. हवाई संरक्षण दलाने परिस्थितीचे निरीक्षण करून या कारवाईला प्रत्युत्तर दिले.  चीनच्या या कारवाईचा बदला म्हणून तैवानने लढाऊ विमाने, नौदल जहाजे आणि तटीय क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. 
 
आता पर्यंत मे महिन्यात चीनची लष्करी विमाने आणि नौदल जहाजे 39 वेळा तैवानच्या सीमेवर दिसली आहे. एप्रिल मध्ये तैवानच्या हवाई क्षेत्रात सुमारे 164 चिनी विमानांना ट्रेक केलं. सप्टेंबर 2020 पासून, चीनने तैवानच्या आसपास कार्यरत लष्करी विमाने आणि नौदल जहाजांची संख्या वाढवली त्यांनतर चीनच्या सैन्याने तैवानच्या सामुद्रधुनी सीमेवर आणखी विमाने, युद्धनौका आणि ड्रोन पाठवले आहेत.
 
Edited By- Priya Dixit