बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (21:22 IST)

इंडोनेशियात कोल्ड लावाचा उद्रेक, 52 लोकांचा मृत्यू

Cold lava erupts in Indonesia killing 52
सध्या इंडोनेशियात हवामानासह कोल्ड लावाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रामध्ये शनिवारी रात्री कोल्ड लावामुळे पूर आला या पुरामुळे आता पर्यंत 52 लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे मृतदेह अद्याप सापडले नाही. 

इंडोनेशियातील मेरापी या सक्रिय ज्वालामुखीवरून वाहणाऱ्या थंड लावामुळे आलेल्या पुरात कोल्ड लावा, पुराचे पाणी, चिखल, पाऊस मिश्रित होते. या कोल्ड लावाच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.  या पुरातून वाचविण्यासाठी 3 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 
या लावामुळे जीवितहानी सोबत मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पुरात 250 घरे उध्वस्त झाली आहे. भातशेतीचे नुकसान झाले आहे. रस्ते, बंधारे खराब झाले आहे. पुरामुळे अनेक लोक जखमी झाले असून 17 लोक बेपत्ता झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरु आहे. 

सध्या पश्चिम सुमात्रामध्ये पूर थांबला असून येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पूर आणि भूस्खलनासारख्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात.लोकांना समुद्र, डोंगर, नद्यांपासून दूर राहण्याची सूचना हवामान खात्यानं दिली आहे. 

Edited by - Priya Dixit