रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

डोकलाम वाद : चीनकडून भारताने माघार घेतल्याचा दावा

भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे सैन्य या भागातून मागे घेण्यात येत असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच चीनने भारताने माघार घेतल्याचा दावा केला आहे, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
 
भारताच्या सिक्कीम सीमेजवळ भूताननजीकच्या डोकलाम भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी भारत व चीनमध्ये तणाव स्थिती आहे. या भागात चीन रस्ते बांधत असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे भारताने म्हटले तर, चीन आपल्या स्वायत्ततेत्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं सांगत चीनने आक्रमक भूमिका कायम ठेवली. यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरा समोर ठाकले आणि 1962 नंतर प्रथमच एवढी तणावाची वेळ दोन्ही देशांदरम्यान आली. मात्र, सोमवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तणाव निवळत असल्याचे व दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याचे सांगत चांगली बातमी दिली.  या वृत्तास चिनी ग्लोबल टीव्ही नोटवर्कनेही दुजोरा दिला. मात्र, आता त्यानंतर आलेल्या चीनच्या या पवित्र्यानंतर तणाव निवळल्याच्या वृत्ताबाबतच संशय निर्माण झाला आहे.