मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चीनचा लडाखमध्ये घुसण्याचा प्रयत्न

चीनने लडाख सीमेवरही भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह या ठिकाणी चिनी सैन्याने स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी ६ ते ९च्या सुमारास दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा भारतीय सैन्याने तो हाणून पाडला. भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक किरकोळ जखमी झाले.
 
चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैनिकांनी मानवी साखळी करुन त्यांना तिथल्या तिथेच थोपवलं. भारतीय सैनिकांकडून मिळालेल्या या चोख उत्तरानंतर अखेर चिनी सैनिकांनी माघार घेतली.