बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 29 एप्रिल 2017 (08:28 IST)

राष्ट्रपतींचे काम सोपे वाटले होते -ट्रम्प

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेण्यास १00 दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना सत्तेचा मुकुट काटेरी असल्याची कबुली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 'मला वाटले होते राष्ट्रपतींचे कार्य सोपे असावे. मात्र, माझ्या मागील आयुष्यापेक्षा आता जास्त काम करावे लागत आहे. माझ्या मागील आयुष्यात खूप गोष्टी होत असे. मला मागील आयुष्यच चांगले वाटत आहे,' असा स्वानुभव ट्रम्प यांनी कथन केला आहे. २४ तास कडक सुरक्षा असल्याने तुम्ही खरंच कुठेही जाऊ शकत नाही. हे एखाद्या कोषात अडकल्यासारखे आहे. राष्ट्रपती झाल्यापासून आपण ड्रायव्हिंग करू शकत नसल्याबद्दलही ट्रम्प यांनी खंत व्यक्त केली आहे.