गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (20:25 IST)

Earthquake:इंडोनेशियातील भूकंपामुळे पृथ्वी हादरली, रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेची नोंद

earthquake
युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, शुक्रवारी इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी नोंदवण्यात आली. यूएसजीएसनुसार, भारतीय वेळेनुसार दुपारी 345 वाजता इंडोनेशियातील तुबान शहरापासून 96 किमी उत्तरेस भूकंप झाला.
 
इंडोनेशियामध्ये भूकंपामुळे पुन्हा पृथ्वी हादरली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.25 वाजता हा भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी मोजली गेली. भूकंपाची ही तीव्रता अत्यंत धोकादायक मानली जाते. भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियातील तुबानपासून 96 किमी उत्तरेस होता. याआधीही गुरुवारी 13 एप्रिल रोजी इंडोनेशियातील तनिंबर बेटावर 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. स्थानिक वेळेनुसार पहाटे 04:37 वाजता इंडोनेशियाच्या भागात भूकंप झाला. या भूकंपात जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.
 
Edited By - Priya Dixit