गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (10:30 IST)

भूकंपाने हादरला हा देश, आता सुनामीचा इशारा

न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांवर गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.1 इतकी मोजली गेली आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या 10 किलोमीटर आत होता. शास्त्रज्ञांनी आता सुनामीचा इशाराही दिला आहे.
 
गेल्या महिन्यात तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात 60,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर दोन लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यामुळे 90 लाखांहून अधिक लोक बाधित झाले. 47 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले.