पाकिस्तानला भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.6, जीवित हानी नाही
सोमवारी दुपारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. भूकंपाची नोंद दुपारी 1:26:32 वाजता (भारतीय वेळेनुसार) झाली.
भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर होते. त्याचे केंद्रबिंदू 29.12 अंश उत्तर अक्षांश आणि 67.26अंश पूर्व रेखांशावर होते, जे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात येते.
अद्यापपर्यंत कोणत्याही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. बलुचिस्तानच्या काही भागात लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले आणि खबरदारीचा उपाय म्हणून अनेक लोक घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की परिस्थिती सामान्य आहे, परंतु भूकंपानंतरच्या धक्क्यांची शक्यता कायम आहे. त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit