सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (10:39 IST)

मटणावरून लग्नात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

mutton
पाकिस्तानात  लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात भांडण झाल्याची घटना घडली आहे. 24 ऑगस्ट 2023 सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एकमेकांशी भांडण करताना दिसत आहे. 
 
या व्हिडीओ मध्ये एका टेबलावर बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. या जेवणासाठी पांढरा कापड लावून पुरुष आणि महिलांसाठी जेवण्याची  वेगळी व्यवस्था केली आहे. एक माणूस टेबलाजवळ येतो आणि पाहुण्यांची टोपी फेकतो. काही वेळा नंतर  वातावरण बदलते आणि लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतात. आणि पाहता पाहता तिथले दृश्य हिंसक होते. काही वेळातच काही जण एकमेकांना खुर्च्या उचलून फेकून मारतात. काही महिला भांडण थांबवायला येतात. हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला गेला असून 333,000 हुन अधिक वेळा बघितला आहे. 
ही घटना 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडल्याचं सांगण्यात येत आहे. Bolton च्या एका  हॉलमध्ये एका लग्नासाठी हे पाहुणे जमले होते. यादरम्यान वादावादी होऊन प्रकरण हाणामारीवर पोहोचलं. आता या वादामागचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही. मात्र, पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit