सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (11:59 IST)

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

pervez
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते अमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होते.  
 
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. 1947 मध्ये त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला.  फाळणीच्या काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्यांचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.यानंतर त्यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली, 1949 मध्ये ते तुर्कीला गेले.काही काळ ते आपल्या कुटुंबासह तुर्कीमध्ये राहत होते,त्यांनीही  तुर्की भाषा देखील शिकली. मुशर्रफ हे खेळाडू राहिले आहेत.  1957 मध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पुन्हा पाकिस्तानात परतले. त्यांचे शालेय शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले आणि कॉलेजचे शिक्षण लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. 
 
परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. 79 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत होते.  संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते अमायलोइडोसिस या आजाराने ग्रस्त होते. त्यांनी आज अखेरचा  श्वास घेतला. 
 
Edited By - Priya Dixit