गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बार्सिलोना , गुरूवार, 24 जून 2021 (08:52 IST)

McAfeeचे संस्थापक जॉन मॅकॅफीने आत्महत्या केली

अँटीव्हायरस गुरु आणि McAfeeचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांनी बुधवारी तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्पेनमधून अमेरिकेत आणण्याच्या निर्णया नंतर त्यांनी हे पाऊल उचलले.
 
उल्लेखनीय आहे की बुधवारी कर चुकवल्याप्रकरणी मॅकेफीला अमेरिकेत प्रत्यार्पणाचे आदेश देण्यात आले. जेल अधिकारी त्यांच्या आत्महत्येमागील कारणे शोधत आहेत.
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मॅकॅफीला बार्सिलोना विमानतळावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर, प्रत्यार्पणाच्या कारवाईमुळे ते तुरूंगात होते. क्रिप्टोकरन्सीस चालना देताना त्याने मिळवलेले उत्पन्न जाहीर न केल्याचा त्याच्यावर आरोप होता.