रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (15:40 IST)

लोक समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना समुद्रात हेलिकॉप्टर कोसळले

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील मियामी बीचजवळ समुद्रात हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर शेकडो लोक पोहत होते आणि लाटांचा आनंद घेत  होते. या अपघातात दोन जण जखमी झाले, मात्र एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.20 वाजता घडली. हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ बंद करून तपास सुरू केला. दुसरीकडे, फेडरल एव्हिएशन अथॉरिटीही या अपघाताची आपल्या स्तरावर चौकशी करण्याची तयारी करत आहे.
 
मियामी बीच पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संपूर्ण समुद्रकिनारा माणसांनी खचाखच भरल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर आकाशातून एक हेलिकॉप्टर समुद्रात पडते. गोंधळून तेथे उपस्थित लोक इकडे तिकडे धावू लागले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहेत. व्हिडिओ शेअर करताना एका युजरने लिहिले की, हे भयानक आहे.
 
घटनेचीमाहिती मिळताच बचाव पथक लोकांपर्यंत पोहोचले आणि लोकांना बाहेर काढले. अपघाताचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासानंतरच यामागचे कारण समोर येईल. हेलिकॉप्टर मधोमध क्रॅश झाले असते तर मोठी हानी आणि जीवितहानी झाली असती.