गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:34 IST)

हिलरींची आघाडी कायम!

Hillary Clinton
अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी आघाडी कायम राखली आहे. हिलरी यांना रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दोन टक्के अधिक मतदारांचा पाठिंबा असल्याचे जनमत चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, क्लिंटन यांची आघाडी लक्षणीयरीत्या घटली आहे.
 
‘एबीसी न्यूज’/‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलेल्या ताज्या जनमत चाचणीतही डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत हिलरी यांना ४७ टक्के, तर ट्रम्प यांना ४५ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हिलरी क्लिंटन यांची ही आघाडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.