1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Himanshi Khurana was brutally murdered in Canada

हिमांशी खुरानाची कॅनडात निर्घृण हत्या, साथीदार अब्दुल गफरीवर संशय

Himanshi Khurana news : कॅनडातील टोरंटोमध्ये भारतीय वंशाच्या हिमांशी खुराणाची निर्घृण हत्या करण्यात आली. 30 वर्षीय हिमांशीचा मृतदेह तिच्या घरातून सापडला. या प्रकरणासंदर्भात पोलिस हिमांशीचा साथीदार अब्दुल गफूरीचा शोध घेत आहेत.
हिमांशीचा साथीदार अब्दुल गफूरी याने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. सुरुवातीच्या तपासात हे प्रकरण जोडीदाराच्या हिंसाचाराचे असल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा टोरंटो पोलिसांना हिमांशी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली. 19 डिसेंबरच्या रात्रीपासून तिचा शोध सुरू झाला. 20 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 च्या सुमारास तिचा मृतदेह एका घरात आढळला.
 
 
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, "भारतीय नागरिक हिमांशी खुरानाच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही शोकग्रस्त कुटुंबासोबत आहोत. भारतीय दूतावास कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देतो."
Edited By - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
हिंदूंनी 4 मुले जन्माला घालावी नवनीत राणा यांचे विधान