सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (14:37 IST)

‘मी फोटोग्राफर आहे आणि मी पुरुषांचे नग्न फोटो काढते’

photographer ushi lee
सहा पुरुष एका खोलीत आहेत. एक जण त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळतो आहे. एक महिला त्यांना कॅमेऱ्यातून बघतेय आणि त्या पुरुषांना पोझ बदलताना सांगते. ते सर्व पुरुष नग्नावस्थेत आहेत.
 
एक श्रृंगारिक फोटोशूट सुरू आहे. मात्र त्यात एक मोठा फरक आहे. सर्व पुरुष नग्नावस्थेत आहेत आणि संपूर्ण कपडे घातलेले बाई ते फोटोशूट करतेय.
 
फोटोग्राफरचं नाव युशी ली आहे. तिचा जन्म चीनमध्ये झाला आहे. ती आता लंडनमध्ये राहते.
 
फोटोग्राफीच्या क्षेत्रात तिला बदल आणायचे आहेत आणि विशेषत: श्रृंगारिक फोटोग्राफी क्षेत्रात.
 
पुरुषांचं शरीर हे लैंगिक आकर्षणाचं केंद्र
ली च्या मते तिला हा ट्रेंड बदलायचा आहे. पुरुष फोटोग्राफर्स आणि चित्रकारांनी स्त्रियांची नग्नचित्रं हजारो शतकांपासून काढली आहेत, असं ती म्हणते.
 
“आता माझ्या हातात कॅमेरा आहे. मला जे वाटतं त्याचे मी फोटो काढते.”
 
काही पुरुषांनी टिंडर सारख्या डेटिंग अपवर अर्धनग्न फोटो लावले आहेत. मात्र ली म्हणते की ते तिला फारसे अपील होत नाहीत. “आकर्षक दिसण्याबाबत पुरुष फारसा विचार करत नाहीत,” असं ती म्हणते.
 
आताही पुरुष मॉडेल्सना नग्न फोटोसाठी कशी पोझ द्यायची हे नीट कळत नाही. “पुरुष स्वत:बद्दल फारसा विचार करत नाही. स्वत:ला आकर्षक कसं ठेवायचं याबाबत फारसा विचार करत नाही," ती पुढे म्हणते.
 
युशी ली म्हणते की तिची कला, जेंडर, लैंगिक आकर्षण आणि लैंगिक इच्छांच्या आसपास फिरते.
 
ती म्हणते की पुरुषांचं शरीर हे लैंगिक आकर्षणाचं केंद्र असतं.
 
“स्त्रिया सुंदर असतात किंवा त्या असायला हव्यात असं नेहमी मानलं जातं. त्यामुळे आपण असा विचार करतो की स्त्रियांचं शरीर सुंदर असतं. आपण स्त्रियांच्या शरीराचं पुरुषांच्या शरीरापेक्षा जास्त कौतुक करतो,” ली सांगतो.
 
“मात्र आपण प्राण्यांकडे पाहिलं तर नर प्राणी सगळ्यांत जास्त सुंदर असतात. उदा. सिंह आणि मोर. श्रृंगारिक फोटोग्राफीच्या क्षेत्रात पुरुषांच्या शरीराला कमी महत्त्व दिलं गेलं आहे. मला त्यात असंतुलन जाणवतं. पुरुषांच्या शरीराला फारसं महत्त्व दिलं जात नाही,” ती पुढे म्हणते.
 
‘मी स्वत:कडे सूत्रं घेते’
तिने काढलेल्या फोटोंमध्ये पुरुषांचं नैसर्गिक सौंदर्या खुलून दिसतं असा तिचा दावा आहे. “मी काढलेले फोटो माझ्या इच्छांचं मूर्त स्वरुप आहे असं मला वाटतं,” ली म्हणते.
 
काही फोटोमध्ये युशी ली स्वत: जाते. हा फोटो आणि प्रेक्षकांमधलं नातं आणखी गुंतागुंतीचं आणि विशेष करण्याचा प्रयत्न असल्याचं ती सांगते.
 
ली चीनची आहे. पाश्चिमात्य देशात आशियाई बायका या खुज्या म्हणजे कमी उंचीच्या तरी आकर्षक असल्याची धारणा आहे. ती म्हणते तिची ही प्रतिक्रिया या धारणेला उत्तर देण्याची प्रक्रिया आहे.
 
न्यूड मॉडेल्सचं याबाबत काय मत आहे?
जेव्हा महिला पुरुषांना त्यांचे फोटो पाठवायला सांगते तेव्हा त्यांना काय अपेक्षा आहे हेच पुरुषांना कळत नाही, असं मॉडेल अल्स्टिर ग्रॅहमला वाटतं.
 
“जेव्हा महिला पुरुषांना फोटो पाठवायला सांगते तेव्हा पुरुष त्यांच्या लिंगाचा फोटो पाठवतात. मी माझ्या हातापायांचा फोटो पाठवल्यावर तसंही काय होणार आहे?” असा प्रश्न ते विचारतात.
 
इम्युनेल अदेन्ये हे एक न्यूड मॉडेल आहे. ते म्हणतात की त्यांनी त्यांच्या शरीरात काही सौंदर्यसुद्धा आहे असं वाटलं नाही. “मला असं कायम वाटायचं की शरीराचं कार्य शरीर दिसण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे,” ते सांगतात.
 
“मला कारचं इंजिन नुसतं बघण्यापेक्षा ते इंजिन व्हायला आवडेल. मी पुरुषांचं शरीर कधीही आनंदाचं साधन म्हणून पाहिलं नाही. मी कायम त्याची उपयुक्तता पाहिली आहे,” असं अडेन्ये म्हणतात.
 
पुरुषांच्या शरीराकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं का?
युशी ली यांचे फोटो शूट नेहमीच्या रॅप व्हीडिओपेक्षा वेगळे असतात. रॅप व्हीडिओमध्ये अर्धनग्न स्त्रिया पुरुष गायकांच्या आसपास नाचत असतात. इथे परिस्थिती एकदम वेगळी आहे असं अदेन्ये म्हणतात.
 
मात्र लीच्या फोटोमधल्या पुरुषांकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं का, असाही प्रश्न निर्माण झाला. त्यावर पुरुष मॉडेल्सने सांगितलं की हे सगळं त्यांच्या परवानगीने होत आहे आणि ली त्यांना अतिशय आदराने वागवते.