1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. income of obama after retirement

निवृत्तीनंतरही ओबामांवर धनवर्षाव कायम राहणार!

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा निवृत्तीनंतरचा काळदेखील त्यांच्यावर अनेक मार्गानी धनवर्षाव करणार ठरणार आहे. व्याख्याने, अध्यापन, लेखन, मंडळाचे सदस्य आणि एका व्यावसायिक बास्केटबॉल संघाचे मालक म्हणून ते कोट्यावधी डॉलर कमावू शकतात.
 
ओबामांना केळव पुस्तके लिहून तीनशे कोटी रूपयांची कमाई करता येणार असून, त्यांना निवृत्तीवेतनापोटी तब्बल 1 कोटी 40 लाख रूपये मिळणार आहेत. सध्याची महागाई लक्षात घेता यामध्ये आणखी वाढ होऊ शकते़, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
ओबामा यांनी 2009 मध्ये केवळ पुस्तकांच्या लिखाणातून 31 कोटी रूपये कमावले असल्याने ते आता पूर्णवेळ लेखक होण्याचीच शक्यता अधिक आहे. मागील वर्षी ओबामा यांची संपत्ती तब्बल 12.1 दशलक्ष डॉलर म्हणजे 77 कोटी रूपये एवढी होती.
पुढील लेख
राष्ट्रगीतावेळी च्युईंग गम चघळत होता रसूल!