सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (16:54 IST)

India China Border : PLA सैनिकांच्या भारतासोबत झालेल्या चकमकीवर चीनचं पहिलं वक्तव्य

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत वक्तव्य केले असतानाच आता या मुद्द्यावर चीनकडूनही पहिले वक्तव्य आले आहे. सध्या भारतीय सीमेवरील परिस्थिती स्थिर असल्याचे चीनने म्हटले आहे. 
 
विशेष म्हणजे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएलएने भारतीय सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना धाडसाने परतवून लावले. त्यांनी सांगितले की या चकमकीत एकही जवान शहीद झाला नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. 
 
 चिनी मीडियामध्ये आतापर्यंत सैनिकांच्या चकमकीच्या बातम्या येत नाहीत. चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक हू शिजिन यांची फक्त एक पोस्ट चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शिजिन यांनी भारत-चीन सैनिकांमधील चकमक आणि जीवितहानी याबद्दल बोलले आहे.
 
Edited by - Priya Dixit