शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (18:50 IST)

मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला

snake
शव विच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. अमेरिकेच्या मेरीलँड मधून एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.खरं तर शव विच्छेदन गृह ऐकले की अंगाचा थरकाप होतो. अशा ठिकाणी लोक जाणं तर सोडा नाव देखील काढत नाही. पण जे लोक तिथे काम करतात त्यांच्यापुढे कधी कधी असे काही अनुभव येतात ज्यांना ऐकल्यावर कोणीही हादरेल. असेच काहीसे प्रकार घडले आहे. अमेरिकेतील मेरीलँड मध्ये. इथे शव विच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. ते बघितल्यावर शवविच्छेदन तंत्रज्ञांनीपळाली. जेसिका लोगान असे या शवविच्छेदन तंत्रज्ञ चे नाव आहे. 
 
जेसिका ने हा भीतीदायक अनुभव सांगितला. ती म्हणाली, तिला तिचे हे काम आवडते. हे काम इतर कामापेक्षा वेगळे आहे. तिने सांगितले की, तिला तो काळ आठवला जेव्हा तिला शव विच्छेदन करताना एका माणसाच्या मांडीत जिवंत साप दिसला. जेसिका लोगान नऊ वर्षांपासून शवविच्छेदन तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. 
पण हा अनुभव तिच्यासाठी खूप भीतीदायक होता.अचानक मृतदेहाच्या आतून साप आल्यानंतर ती आरडाओरड करत खोलीभर पळत होती. सापाला पकडे पर्यंत  मी त्या खोलीत परतले नाही. जेसिकाने सांगितले की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर साप त्याच्या मृतदेहात शिरला होता. मृताच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती. हा मृतदेह   रस्त्याच्या कडे ला आढळून आला होता.
 
शवविच्छेदन तंत्रज्ञ जेसिका यांनी सांगितले की, मृत व्यक्ती कोणत्या स्थितीत सापडतात यावर मृतदेहाची स्थिती अवलंबून असते. जर मृतदेह सुकलेले  आणि थंड असेल तर त्यात सहसा जास्त कीटक आढळत नाहीत. पण जर ते उष्ण आणि दमट असेल तर शरीरात खूप जंत आढळतात.
 
कामाचे वर्णन करताना जेसिका म्हणाली, “बहुतेक हॉस्पिटल्समध्ये शवविच्छेदनाचे अवयव वैयक्तिकरित्या काढून टाकून किंवा अवयवाद्वारे शवविच्छेदन केले जाते. माझे काम सर्व अवयव काढून टाकणे आहे.
 
Edited by - Priya Dixit