शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अमेरिकेत बायकोसोबत असताना विमानात झोपलेल्या महिलेचा लैंगिक छळ, भारतीयाला 9 वर्षाची कोठडी

वॉशिंग्टन - विमानात एका महिलेचे लैंगिक शोषण करणार्‍या भारतीय इंजिनिअर प्रभू राममूर्तीला अमेरिकन कोर्टाने 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 35 वर्षीय राममूर्तीने जानेवारीत विमानात एका महिलेशी गैरवर्तन केले होते. तामिळनाडूच्या प्रभूला अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवले आहे.
 
प्रभू राममूर्ती 2015 मध्ये एच-1बी व्हिसावर अमेरिकेत गेला होता. डेट्रॉयट कोर्टाने म्हटले की त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला भारतात पाठवण्यात येईल.
 
कोर्टाने प्रभू राममूर्तीला ऑगस्टमध्ये पाच दिवस चाललेल्या सुनावणीनंतर दोषी ठरवले होते. कोर्टात प्रस्तुत करण्यात आलेल्या पुराव्यांप्रमाणे राममूर्तीने 3 जानेवारी रोजी लास वेगासहून डेट्रॉइटला जात असलेल्या विमानात झोपलेल्या एका महिलेचा लैंगिक छळ केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे हे कृत्य करताना त्याची पत्नीही देखील त्याच्या शेजारी प्रवास करत होती. 
 
पीडित महिला झोपेतून उठल्यावर तिचे कपडे अव्यवस्थित होते म्हणून तिने अटेंडंटला मदतीसाठी बोलावले. एफबीआयप्रमाणे विमानातील प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. तरी विमानात दुष्कर्माच्या घटना वाढत असून प्रवाशी नशेत असणे, अटेंडेंट्सची संख्या कमी असणे आणि रात्रीच्या फ्लाईटमध्ये अंधार असणे हे कारण प्रमुख आहेत.