1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2019 (14:48 IST)

भारतीय मूळच्या डेंटिस्टची ऑस्ट्रेलियात हत्या, सूटकेसमध्ये आढळले मृतदेह

international news
भारतीय मूळची 32 वर्षीय महिला डेंटिस्ट ऑस्ट्रेलियात मृत अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर चाकूच्या जखमा आहेत. ती काही दिवसांपूर्वी सिडनी येथील व्यस्त भागात गूढ परिस्थिती गायब झाली होती.
 
न्यू साऊथ वेल्स पोलिसांप्रमाणे प्रीती रेड्डी या नावाच्या महिला डेंटिस्टचं मृत देह ईस्टर्न सिडनी स्ट्रीटच्या कार पार्किंग भागात सूटकेसमध्ये सापडले. रेड्डी यांच्या माजी प्रियकाराची देखील सडक अपघातात मृत्यू झाला आहेत.
 
महिलेला शेवटले रविवारी जियोर्ज स्ट्रीटच्या मॅकडोनाल्डच्या रांगेत उभे बघितले गेले होते. मंगळवारी पोलिसांना तिची गाडी किंग्सफोर्ड सापडली होती. मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे महिलेचा गाडीत तिचा मृत देह एका सूटकेसमध्ये सापडला. तिच्या शरीरावर चाकूने अनेक जखमा केल्याचे दिसून येत आहे.
 
अधिकार्‍यांप्रमाणे महिला डेंटल कॉन्फ्रेंसमध्ये सामील झाली होती आणि तिने आपल्या कुटुंबाशी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास शेवटची बातचीत केली होती. तिने सांगितले होते की नाश्ता झाल्यावर ती घरी जाईल परंतु ती परत आली नाही म्हणून कुटुंबाने पोलिसांशी संपर्क केला.