शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (09:42 IST)

Israel Hamas War:गाझा रुग्णालयानंतर आता चर्चवर हल्ला, अनेकांचा बळी

Israel Hamas war
Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात सुमारे पाच हजार लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी गाझा येथील अल-अहली रुग्णालयात स्फोट झाला, ज्यात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्यासाठी हमास आणि इस्रायल एकमेकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, हमासने इस्रायलवर आणखी एक आरोप केला आहे. त्यांनी इस्रायलवर चर्चच्या कंपाऊंडवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. 
 
हमास-नियंत्रित गृह मंत्रालयाने सांगितले की, गाझा पट्टीतील एका चर्चमध्ये आश्रय घेणारे अनेक लोक गुरुवारी उशिरा झालेल्या हल्ल्यात ठार झाले . ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चच्या कंपाउंडवर झालेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अनेक जण जखमीही झाले आहेत. 
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पॅलेस्टिनी भागात संघर्ष सुरू झाल्यानंतर गाझातील अनेक रहिवाशांनी चर्चमध्ये आश्रय घेतला होता. एखाद्या धार्मिक स्थळाजवळच हा हल्ला करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, इस्रायली लष्कराने सांगितले की ते कथित हल्ल्याचा तपास करत आहेत.
 
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन आता 14 दिवस झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे पाच हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
 






Edited by - Priya Dixit