गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (16:48 IST)

ऐकावे ते नवलच ! खास पद्धतीने साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस, खर्च केले लाखो रुपये

काही लोकांना मुक्या प्राण्यावर विशेषतः  कुत्र्यांबद्दलचे असणारे प्रेम आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहत असतो. कारण तो आता लोकांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. आणि लोक या प्राण्यांना त्यांच्या कुटुंबाचा भाग मानू लागले आहेत. अनेक वेळा लोक आपल्या पाळीव प्राण्यांसाठी साठी असं काही न काही करतात की ते जगभर चर्चेचा विषय बनतात.
 
अशीच एक बातमी चीनमधून समोर आली आहे इथे एका महिलेने आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. या महिलेने आपल्या कुत्र्याच्या वाढदिवसावर तब्बल 11 लाख रुपये खर्च केले आहेत. बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते, हा शो जवळपास 30 मिनिटे चालला होता, विशेष म्हणजे कुत्र्यांच्या आवाजात हॅपी बर्थडे गाणे देखील गायले होते.
 
लवकरच हा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला. हा खास वाढदिवस पाहिल्यानंतर अनेक यूजर्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. चीनमधील हुनानमध्ये डौ डू नावाच्या कुत्र्याचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्या महिलेने वाढदिवसासाठी स्वत: सांताक्लॉजचा ड्रेस तयार केला होता. 
 
या कुत्र्याच्या वाढदिवसाला 500 हून अधिक ड्रोनचा वापर करण्यात आला होता. जिथे ड्रोन मधून  'Dou Dou: a very happy birthday' आणि "Wish Dou Dou a happy 10th birthday!" लिहिले होते. कुत्र्याच्या या खास वाढदिवसाचा व्हिडिओ चिनी प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला, त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
 
 यानंतर, अनेक सोशल मीडिया वापरकर्ते लिहित आहेत की सामान्य लोकांपेक्षा कुत्र्याचे आयुष्य चांगले आहे. एका युजरने तर लिहिलं आहे की त्याला पुढच्या आयुष्यात कुत्रा व्हायला आवडेल. त्यामुळे ही केवळ पैशाची उधळपट्टी आहे, असे युजर्स लिहित असतानाच अनेक युजर्सने हा पैसा ड्रोन शोसाठी नव्हे तर प्राण्यांच्या दानासाठी खर्च केला असता तर बरे झाले असते, असा सल्ला देत आहेत.