मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

झारच्या पुतळ्याच्या डोळ्यातून ओघळले अश्रू

गणपतीने दूध पिणे किंवा मेरीमातेच्या डोळ्यातून रक्त येणे, या भारतात गाजलेल्या अफवा होत. मात्र असाच प्रकार थेट रशियात घडला असून तेही चक्क झारच्या पुतळ्याच्या बाबतीत.
 
रशियाचा शेवटचा राजा असलेल्या झार निकोलस द्वितीय याचा हा पुतळा आहे. क्रिमियाची राजधानी सिमफेरोपोल येथे तो गेल्या वर्षी उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, ही बातमी पसरल्यानंतर अनेक लोकांनी तिकडे धाव घेतली.
 
रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चच्या श्रद्धेनुसार निकोलस द्वितीय याला संत मानण्यात येते.