शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरियाची ‘ही’ आयडिया

चीनमध्ये करोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. चीनशेजारील देशांनीही करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगळ्याच पद्धतीने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
 
दक्षिण कोरियामध्ये करोनाचा संसर्ग झालेले २९ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षिण कोरिया सरकारने या रुग्णांची माहिती एकत्रित केली आहे. यामध्ये संबंधित रुग्णांचा मोबाइल डेटा, क्रेडिट कार्डचे रेकोर्ड, सीसीटीव्ही फूटेज, सार्वजनिक वाहतुकीचा केलेला वापर आदी सगळी माहिती एकत्र करण्यात आली आहे. ही सर्व माहिती आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील लोकांना करोनाबाधितांची माहिती उपलब्ध होत आहे. या माहिती आधारे या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळले जाईल अशी खात्री प्रशासनाला वाटत आहे. चीननंतर दक्षिण कोरियात करोनाचा संसर्ग वेगाने होत आहे.