1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Leo Varadkar: Ireland set to have first gay PM

लिओ वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान

महाराष्ट्रातील मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला. त्यात वराडकर हे विजयी झाले असून, ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मतं मिळाली. आयर्लंडमध्ये 2007 साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले आणि अखेर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. 

पुढील लेख
पुणताब्यांतील कोअर कमिटीत मतभेद, नाशिकमध्ये संप सुरूच