सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 जानेवारी 2017 (09:48 IST)

बॉलीवूडची मनस्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मनसोक्त नाचणार

manavi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूडचाही हातभार असणार आहे. या कार्यक्रमावेळी  अभिनेता अजय देवगनसोबत ‘अॅक्शन-जॅक्सन’ सिनेमात काम केलेली अभिनेत्री मनस्वी ममगई या सोहळ्यात एक डान्स  करणार आहे.तिने हा डान्स ट्रम्प यांना समर्पित केला आहे.डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मनस्वी भारताची रिपब्लीकन हिंदू कोएलिशन अॅम्बेसेडर असून ट्रम्प देखील रिपब्लीकन पक्षाचे आहेत. ट्रम्प हे भारताच्या बाजूने नेहमी बोलत असतात मात्र त्यांनी प्रचार दरम्यान अमेरिकेतील होत असलेल्या आउट सोर्सिंग नोकऱ्या संधर्भात वेगळी भूमिका घेतली आहे.त्यामुळे ट्रम्प काय निर्णय घेतात याकडे सुद्धा भारताचे लक्ष आहे.