शुक्रवार, 9 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2017 (09:20 IST)

जगात महागड्या शहरांमध्ये मुंबई 21 व्या स्थानी

mumbai cars
जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा 21 क्रमांक लागला आहे. नाईट फ्रँक वेल्थ अहवालानुसार मुंबईनं टोरंटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्को सारख्या जगभरातील प्रसिद्ध शहरांनाही मागे टाकलं आहे.दिल्लीनं बँकॉक, सिएटल, जकार्ता या शहरांवर मात करत 35 वा क्रमांक पटकावला आहे. या अहवालामध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या 89 देशांतील 125 शहरांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या दशकभरात भारतात 290 टक्क्यांनी अतिश्रीमंतांची वाढ झाल्याचं दिसून आलं. भविष्यातील संपत्तीधारकांच्या यादीत यादीत मुंबईचा 11 वा क्रमांक लागतो. या यादीतही मुंबईने शिकागो, सिडनी, पॅरिस, सेओल, दुबई यांना मागे टाकलं आहे. सर्वात महागड्या मुख्य निवासी (प्राईम रेसिडेंशियल) शहरांमध्ये मुंबई 15 व्या स्थानी आहे.