गुरूवार, 5 मार्च 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:16 IST)

पाकिस्तानी हॅकर्सकडून एनएसजीची वेबसाईट हॅक

national security guard
पाकिस्तानशी हॅकर्सनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा गार्ड अर्थात एनएसजीची वेबसाईट हॅक केली आहे. शिवाय या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले आहे. यावर एनएसजीच्या आयटी टीमने तत्काळ कारवाई केली आणि युआरएल डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट एनएसजी जीओव्ही डॉट इन ब्लॉक केले. हे कृत्य पाकिस्तान पुरस्कृत हॅकर्सनी केले असल्याचे एनएसजीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.