बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (13:04 IST)

नवाझ शरीफ यांचे वाईट दिवस सुरूच, दंड वसुलीसाठी आता शेतांचाही लिलाव होणार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे वाईट दिवस सुरूच आहेत. पाकिस्तानी फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने न्यायालयांनी अनेक प्रकरणांमध्ये ठोठावलेला 80 कोटींचा दंड वसूल करण्यासाठी नवाझ शरीफ यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
 
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाज शरीफ यांच्या नावावर जाती उमराह, लाहोरमधील शेतजमिनीचा लिलाव 19 नोव्हेंबरला होणार आहे. याबाबत जाती उमराहच्या भिंतीवर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. लाहोर आणि रावळपिंडी येथील अधिकारी या प्रक्रियेवर देखरेख करत आहेत.
 
जूनमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने नवाझ शरीफ यांच्या संपत्तीचा लिलाव थांबवण्याच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. यापूर्वी 22 एप्रिल रोजी न्यायालयाने नवाझ शरीफ यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते कारण ते अनेक प्रकरणांत फरार आहेत.

त्यानंतर मे महिन्यात न्यायालयाच्या आदेशावरून शेखपुरा येथील फिरोजपूर शहरातील 88 कनाल चार मरला जमिनीचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. बोलीनुसार संपूर्ण जमिनीची किंमत 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.