बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: टोरंटो , शनिवार, 14 जानेवारी 2017 (14:07 IST)

आईच्या रक्तदाबातून कळणार;मुलगा की मुलगी?

new born baby
जन्माला येणाऱ्या बाळाच्या लिंगनिदानाला धरुन अनेक वैज्ञानिक, अवैज्ञानिक पद्धती, तंत्रमंत्र, उपचारांपासून अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. लिंग ठरण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक समाज-धर्मात विविध रूढीपरंपराही आहेत. मुलगा कसा होता आणि मुलगी कधी जन्माला येते, हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक धडपडत आहेत. आता वैज्ञानिकांनी ते ओळखण्याची एक सोपी पद्धत शोधली आहे. जन्माला येणारे बाळ मुलगा आहे की मुलगी हे आता थेट आईच्या रक्तदाबातून कळू शकणार आहे. अभ्यासकांच्या मते गर्भधारणेच्या आधी रक्तदाब कमी असलेल्या स्त्रि या मुलीला जन्म देण्याची शक्यता अधिक असते.
 
कॅनडाच्या माऊंट सिनाय हॉस्पिटलमधील अभ्यासक डॉक्टर रवी रत्नाकर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांनी रक्तदाबाच्या निकषांनुसार बाळाच्या लिंगाचा अभ्यास केला असता उच्च रक्तदाब असलेल्या माता मुलांना तर कमी रक्तदाब असलेल्या माता मुलींना जन्म देण्याची शक्यता असते.