शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे

पाकिस्तानच्या कोर्टाने व्हॅलेंटाईन डे आणि सोशल मीडियावर त्याबाबत मेसेज शेअर करण्यासाठी घातली आहे. व्हॅलेंटाईन डे मुस्लीमविरोधी असल्याची याचिका इस्लामाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला. 
 
अब्दुल वहिद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती. व्हॅलेंटाईन डे हा मुस्लीम परंपरेचा भाग नाही. त्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या त्याच्या प्रचार-प्रसारावरही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका स्वीकारत तातडीने निकाली काढली आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण (पेमरा) आणि इस्लामाबादच्या मुख्य आयुक्तांना कोर्टाने निर्णयाच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.