मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (17:06 IST)

आता चीन मध्ये 'निओकोव्ह' व्हायरस आढळला

चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी आता नवीन कोरोना व्हायरस 'निओकोव्ह'  बद्दल भीतीदायक बातमी दिली आहे. 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोना व्हायरस जगभर पसरला. आता तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार 'निओकोव्ह' आढळला आहे. त्याचा संसर्ग आणि मृत्यू दोन्ही खूप जास्त आहेत. यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो. 
 
कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. त्याचे ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकार कहर करत आहेत. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. 

निओकोव्ह विषाणू नवीन नाही, असेही अहवालात म्हटले आहे. हा मर्स कोव्ह विषाणू MERS-CoV विषाणूशी संबंधित आहे. 2012 मध्ये ते मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडले आहे. हे सार्स कोव्ह 2 सारखेच आहे, जिथून कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरला होता. 

दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये नीओकोव्ह  विषाणू आढळून आला आहे,तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो. चिनी संशोधकांच्या मते, नियोकोव्ह मध्ये उच्च संसर्ग दर गाठण्याची क्षमता आहे आणि प्रत्येक तीन संक्रमितांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो. 

रशियाच्या विषाणूशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभागाने गुरुवारी निओकोव्ह संदर्भात एक निवेदन जारी केले. त्यात असे म्हटले आहे की सध्या निओकोव्ह मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. आत्ता प्रश्न हा नवीन कोरोनाव्हायरस मानवांमध्ये पसरतो की नाही हा नाही, तर त्याच्या जोखीम आणि क्षमतांबद्दल अधिक अभ्यास आणि तपासणी करणे आहे.