आता आठवड्यातून मिळणार अडीच दिवस सुट्टी, या देशाने साप्ताहिक सुट्टीत केला मोठा बदल
आठवड्याच्या सुट्या दोन दिवसांवरून तीन दिवस कराव्यात की नाही यावर जगाच्या विविध भागात मोठी चर्चा आहे. या चर्चेदरम्यान, मंगळवारी यूएईने आठवड्याच्या सुट्टीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून, UAE मध्ये आता शुक्रवारी अर्धा दिवस, शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी असेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता अडीच दिवसांची रजा मिळणार आहे.
नवीन नियम सर्व फेडरल सरकारी कार्यालयांमध्ये नवीन वर्षापासून लागू होईल. या नियमाच्या अंमलबजावणीमुळे UAE हा जगातील पहिला देश बनेल जिथे आठवड्याची सुट्टी अडीच दिवसांची असेल. सध्या हा नियम फक्त सरकारी कार्यालयांमध्येच लागू आहे.
भारतातही कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळेल का?
भारतातही याची चर्चा जोर धरू लागली आहे. सरकार लवकरच नवीन कायदा आणू शकते. रिपोर्ट्सनुसार, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना 3 दिवस रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. मात्र हा नियम लागू झाल्यास दिवसा कामातही वाढ होणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्येही बदल होणार आहेत.