रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (15:30 IST)

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानकडून  पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणी पाकिस्तानने गोळीबार केला. यात बीमबेर गली, कृष्ण घाटी आणि नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांना टार्गेट करुन पाकिस्तानने हल्ला केला. भारतीय जवानदेखील हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याआधी मंगळवारी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमारेषेवर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले. यापैकी एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे  शहिदांचा अपमान करणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने प्रतिहल्ला करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. सीमारेषेवर भारताने  कारवाईला सुरुवात केली आहे. पूंछ, राजौरी, केल आणि मंछिल परिसरात फायरिंग सुरु असून पाकिस्तानला लष्कराकडून चोख उत्तर दिले  जात आहे.