1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (13:19 IST)

पाकिस्तान: लाहोरमध्ये रिक्षात जाणाऱ्या महिलेचा विनयभंग, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इम्रान खानवर लोकांचा राग

पाकिस्तानात महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. रस्त्यावर उतरणाऱ्या महिलांच्या छेडछाडीचे प्रकरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे.अलीकडेच लाहोरमध्ये रस्त्यावर जात असलेल्या एका महिलेसोबत छेडछाडीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानविरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे.  
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान महिलांना सुरक्षा देण्याचा दावा करू शकतात, परंतु सत्य यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. पाकिस्तानात महिलांची स्थिती अत्यंत वाईट आहे.अलीकडेच,पाकिस्तानमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या टिक टॉकरमुलीचा विनयभंग आणि मारहाणीचे प्रकरण थांबले न्हवते की पाकिस्तानमध्ये छेड काढण्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. महिलेसोबत छेडछाडीचा हा व्हिडिओ लाहोरचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक पाकिस्तान सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
 
व्हिडिओ क्लिपमध्ये,दोन महिला व्यस्त रस्त्यावर रिक्षात बसलेल्या दिसत आहेत.त्यांच्यामध्ये एक लहान मूलहीआहे. या दरम्यान, एक तरुण वारंवार महिलेचा विनयभंग करताना दिसतो. त्याचवेळी दुचाकी चालवणारे दोन युवक रिक्षाचा पाठलाग करत आहेत, ज्या महिलेला त्रास दिला जात आहे ती त्याला विरोध करत आहे. ती महिला सुद्धा छळाला इतकी कंटाळली आहे की तिला रिक्षा सोडायची आहे, पण शेजारी बसलेली महिला तिला थांबवते. व्हिडिओनुसार ती ओरडते पण कोणीही हस्तक्षेप करत नाही. 
 
सांगितले जात आहे की हा व्हिडिओ पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या दिवसाचा आहे.14 ऑगस्ट रोजी लाहोरमध्ये ही घटना घडली आहे. कारण रिक्षा हा राष्ट्रध्वज वाहून नेणाऱ्या कार आणि मोटारसायकलींनी वेढलेला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या दिवशी ही घटना घडल्याचे दिसून येते.