मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (11:18 IST)

पाकिस्तान: कुर्रम जिल्ह्यात दोन गटांमध्ये संघर्ष, 10 ठार, 15 जखमी

उत्तर-पश्चिम पाकिस्तानच्या आदिवासी भागात रविवारी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात किमान 10 जण ठार झाले. या हल्ल्यात दोन्ही बाजूंनी जड शस्त्रे आणि  रॉकेट लाँचरचा वापर केला. 
 
उत्तर पश्चिम पाकिस्तानच्या आदिवासी भागातील जंगल जमिनीच्या वादग्रस्त ताब्यावरून रविवारी दोन गटांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रांतीय राजधानी पेशावरपासून 251 किमी अंतरावर असलेल्या कुर्रम जिल्ह्यातील तेरी मेगेल गावातील गाईडू जमाती.ने शनिवारी दुपारी त्यांच्या गावात लाकूड उचलत असलेल्या पेवार जमातीच्या सदस्यांवर गोळीबार केला तेव्हा हाणामारी सुरू झाली. 
 
अलीकडील काही महिन्यांपासून कुर्रम जिल्ह्याच्या वरच्या उपविभागात वनजमिनीच्या मालकीवरून दोन जमातींमध्ये तणाव आहे. एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, "शनिवारी आम्हाला चार लोकांच्या मृत्यूची माहिती मिळाली. आणि आज (रविवार) जेव्हा पेवार बाजूने प्रत्युत्तर दिले  तेव्हा इतर सहा जण मारले गेले. हल्ल्यात दोन्ही बाजूंनी जड शस्त्रांचा वापर केला आणि  रॉकेट लाँचरचाही वापर केला कुर्रम हा अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला उत्तर पश्चिमी पाकिस्तानमधील सीमावर्ती जिल्हा आहे, जिथून सतत बंदुकांचा अंदाधुंद वापर आणि वारंवार दहशतवादी हल्ले होत असल्याच्या बातम्या येत असतात. गोळीबारानंतर पोलीस तुकड्या आणि निमलष्करी दलाला तात्काळ रवाना करण्यात आले. तेव्हाही हाणामारी सुरूच होती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.