रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (18:42 IST)

नेपाळमध्ये बस अपघातात किमान 31 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये बस अपघातात किमान 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये एक भारतीय महिला देखील सामील आहे.
या अपघातात अनेक लोक जखमीही झाले आहेत, ज्यात अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की प्रवाशांनी खचाखच भरलेली बस राजधानी काठमांडूजवळील नदीत अनियंत्रितपणे पडली.
जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.