पेरूमध्ये बस दरीत कोसळली, अनके प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
दक्षिण पेरूमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दुसऱ्या वाहनाशी धडकली. धडक इतकी भीषण होती की बसचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली, ज्यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण पेरूमध्ये बुधवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. एक प्रवासी बस दुसऱ्या वाहनाशी धडकली आणि ती खोल दरीत पडली. या अपघातात किमान ३७ जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अरेक्विपा प्रदेशाचे आरोग्य व्यवस्थापक वॉल्टर ओपोर्टो यांनी स्थानिक रेडिओ आरपीपीला सांगितले की, बस एका पिकअप ट्रकला धडकली आणि रस्त्याने एका दरीत पडली.
Edited By- Dhanashri Naik