1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Raped the wife by bringing different unknown men

धक्कादायक! पतीकडून पत्नीला अमली पदार्थ देऊन 72 अनोळखी पुरुषांकडून वारंवार बलात्कार

पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना फ्रांस मध्ये घडली आहे. पतीने आपल्या पत्नीला अमली पदार्थ पाजत वेगवेगळ्या अनोळखी पुरुषांना घरी आणून पत्नीवर बलात्कार करायला लावण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या क्रूरतेची कहाणी एका महिलेने न्यायालयात सांगितली आहे. 

महिला म्हणाली, तिच्या सोबत हे सर्व घडत असताना समजल्यावर ती खूप घाबरली. महिला 72 वर्षाची असून तिच्या पतीला पत्नी सोबत पुरुषांनी संबंध ठेवताना पाहून समाधान वाटायचे.महिलेच्या पतीने अशी कबुली दिली आहे.  

पत्नीला तिच्या पतीने अंमली पदार्थ पाजले होते त्यामुळे तिच्यावर 70 हून अधिक अनोळखी व्यक्तींनी बलात्कार केला होता. बेशुद्ध महिलेला लैंगिक संसर्गाची लागण झाली होती. या कालावधीत तिला एचआयव्ही सह जगत असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडून कमीतकमी सहा वेळा तिच्यावर अत्याचार झाला. गुरुवारी या महिलेने न्यायालयात ही माहिती दिली. 
 
महिलेने सांगितले की, तिच्या पतीने अनेक पुरुषांना आणून तिच्यावर जवळपास 100 वेळा बलात्कार केला. गिझेलने सांगितले की, तिच्या जीवाला धोका आहे पण हे सर्व कोणीही एका सेकंदासाठी थांबवले नाही.पतीला देखील तिची अवस्था पाहून द्या आली नाही. महिलेने असेही सांगितले की ती तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 
 
पुढील लेख
सिंगापूरहून चीनला जाणाऱ्या बोइंग विमानात बिघाड, सात प्रवाशी जखमी